मेनका गांधींनी SHO ला धारेवर धरलं, म्हणाल्या – ‘झाड तोडणार्‍यांना तात्काळ तुरूंगात टाका अन्यथा…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेनका गांधी आपल्या सुलतानपूर मतदारसंघात दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या निवासस्थानी अनेक तक्रारदारांनी गर्दी केली. त्याच वेळी, एका महिलेने लंभुआ भागातील झाडे तोडल्याची तक्रार केली. झाड तोडल्याची तक्रार ऐकल्यानंतर मेनका संतापल्या. त्यांनी एसएचओला फोन करून सांगितले की, वृक्षतोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. आज जर तुम्ही वृक्षतोड करणाऱ्याला नाही उचलले तर, माझ्या इतके वाईट कोणी नसेल.’

मेनका पुढे म्हणाल्या की, आजपर्यंत तुमच्या क्षेत्रात बरीच झाडे तोडली गेली आहेत, तुम्ही काही केले नाही. पृथ्वी पाल यांनी वृक्षतोड केली आहे, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांना आधी उचला आणि तुरुंगात टाका.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like