Mangal Margi | मंगळ होतोय मार्गस्थ, आता ‘या’ 4 राशींना मिळणार जबरदस्त यश, अडचणी होतील दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mangal Margi | मोठ्या कालावधीपासून वक्रावस्थेत गोचर करत असलेला मंगळ आता मार्गस्थ होत आहे. मंगळ मार्गस्थ झाल्यामुळे अनेक राशीच्या जातकांना त्याचे चांगले परिणाम मिळतील. अडकलेली कामे मार्गी लागतील तसेच कामात यशही मिळेल. (Mangal Margi)
मंगळ जो मेष राशी आणि वृश्चिक राशीचा स्वामी असूनही मोठ्या कालावधीपासून वृषभ राशीत वक्री आवस्थेत गोचरस्थ आहे, आता तो मार्गस्थ होईल. वृषभ राशीतून मंगळाचे मार्गस्थ होणे मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी विशेष ठरणार आहे. वैदिक ज्योतिषनुसार ग्रहांचे सेनापती मंगळदेव १३ जानेवारीला मार्गस्थ होत आहेत, ज्यामुळे या राशीच्या जातकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. (Mangal Margi)
देश आणि जगावर होईल परिणाम
मार्गस्थ होत असलेल्या मंगळाचा परिणाम केवळ राशींपुरता मर्यादित नसेल तर जगभरात त्याचा परिणाम पहायला मिळेल. वैदिक ज्योतिषनुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर मार्गस्थ आणि वक्री होत असतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर दिसून येतो.
सोबत ग्रहांच्या चालीतील हा बदल काही ग्रहांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. मंगळ १३ जानेवारीला वृषभ राशीतून मार्गस्थ होऊन गोचर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की आता तो सरळ मार्गस्थ होईल. ज्यामुळे जातकांवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या कालावधीत त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.
मार्गस्थ मंगळाचा या राशींवर होणार शुभ परिणाम
मेष
मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे मार्गस्थ होणे लाभदायक ठरू शकते. वैवाहिक जीवन आणि पार्टनरशिपवर त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो. सध्या पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर लाभाची शक्यता आहे. सोबतच यावेळी कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासात वाढीचे संकेत आहेत. तसेच जे लोक अविवाहित आहे त्यांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. धाडस आणि पराक्रमाचा लाभ आता चांगल्या प्रकारे मिळू शकतो.
कर्क
मंगळ मार्गस्थ झाल्याने कर्क राशीच्या जातकांच्या धाडस आणि पराक्रमात वाढ होण्याची प्रबळ शक्यता आहे.
मंगळ योगकारी होऊन काही चांगले परिणाम देण्यात सक्षम होईल. नोकरदार जातकांना सुद्धा मेहनतीचे फळ मिळेल.
कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. या कालावधीत तुमचे भाऊ-बहिणींचे सुद्धा सहकार्य मिळेल.
सोबतच मोठ्या कालावधीपासून अडकलेली कामे सुद्धा होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी मंगळाची सरळ चाल चांगल्या दिवसांची सुरूवात होणार असल्याचे दर्शवत आहे.
मोठ्या कालावधीपासून एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर यापासून आराम मिळेल.
आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात.
तर दुसरीकडे जे लोक रिसर्च क्षेत्राशी संबंधीत आहेत त्यांसाठी हा काळ खुपच चांगला आहे.
कुटुंबात एखादे धार्मिक, मंगलकार्य होऊ शकते. या कालावधीत शेअर बाजार,
सट्टा आणि लॉटरीत पैसे कमावण्याची संधी मिळू शकते.
Web Title :- Mangal Margi | mangal margi mars is becoming margi now the people of these zodiac signs will get success and problems will
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update