Mangal Rashi Parivartan 2021 : मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश, ‘या’ 8 राशींना एप्रिलपर्यंत धनलाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने सोमवारी सायंकाळी मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 13 एप्रिल 2021 पर्यंत मंगळ याच राशीत राहिल. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, मंगळाचे हे गोचर काही निवडक राशींची आर्थिक स्थिती मजबूत करू शकते. मंगळाच्या या राशी परिवर्तनाने कोण-कोणत्या राशींना सर्वात जास्त लाभ होईल ते जाणून घेवूयात…

मिथुन –
मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळ ग्रहाचे हे परिवर्तन खुपच लाभदायक राहिल. धनस्थिती मजबूत होईल. घरगुती खर्च कमी होतील. शुभ कार्य संपन्न होतील. प्रवासाचे योग येतील. मात्र, दूरच्या प्रवासात विशेष सावधगिरी बाळगावी लागेल.

कर्क –
कर्क राशीच्या जातकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. कठिण आव्हानांचा सामना करत असलेल्यांना चांगले परिणाम मिळतील. मेहनती लोकांना यश निश्चित मिळेल. पैशाच्या अडचणी असतील तर त्या आता दूर होतील. बहिण-भावाशी थोडाफार वाद होऊ शकतो.

सिंह –
सिंह राशीवाल्यांसाठी सुद्धा हे मंगळ गोचर खुप चांगले आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ खुपच चांगली आहे. मात्र, मोठी गुंतवणुक करण्यापूर्वी शुभचिंतकांचा सल्ला आवश्य घ्या. घर, दुकान किंवा वाहन खरेदीचे योग सुद्धा आहेत. घरात सुखाचे आगमन होईल. धनहानी होणार नाही. मात्र, आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या –
कन्या राशीच्या जातकांना सुद्धा हे गोचर शुभ परिणाम देईल. योजनाबद्ध पद्धतीने काम करणार्‍यांना मोठा लाभ होईल. ज्या लोकांची शुभकार्य मोठ्या कालावधीपासून रखडली होती, ती पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. उत्साह, उर्जा जाणवेल. सरकारी नोकरी किंवा परीक्षेत गुंतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे. मात्र, महिलांना आरोग्याच्या अडचणींमुळे सावध राहावे लागेल.

वृश्चिक –
वृश्चिक राशीला या मंगळ गोचरचे संमिश्र परिणाम मिळतील. धनलाभ होईल. महत्वाची कामे सुद्धा पूर्ण होतील. मात्र, दाम्पत्य जीवनात अडचणी राहतील. पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. तणाव आणि रागामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात.

मकर –
मकर राशीसाठी हे गोचर खुप चांगले मानले जात आहे. या राशीत शनीदेव अगोदरपासूनच विराजमान आहेत. मंगळ वृषभ राशीत गेल्यानंतर तुमचा भाग्योदय होईल. पैशांची स्थिती चांगली होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मात्र, आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ –
कुंभ राशीवाल्यांसाठी सुद्धा हे गोचर खुप चांगले ठरणार आहे. जीवनात अनेक चांगले बदल होतील. नोकरीमध्ये संधी प्राप्त होतील. धन-व्यापाराची स्थिती चांगली होईल. मात्र, वडीलांसोबत वाद-विवाद वाढू शकतो. एखादा मोठा निर्णय घेताना जवळच्या व्यक्तींचा सल्ला आवश्य घ्या.

मीन –
शेवटची रास म्हणजे मीन राशीसाठी सुद्धा हे गोचर खुपच चांगले आहे. रखडलेले पैस मिळतील. जीवनात सुरू असलेल्या पैशासंबंधीच्या समस्या संपतील. कौटुंबिक जीवनात सुद्धा सर्वकाही चांगले होईल. कट कारस्थान करणार्‍यांपासून सावध राहा आणि विनाकारण तणाव घेऊ नका.