राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल यांच्यावर फसवणूकीचा आणखी एक FIR

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक झाल्यानंतर ९ वर्षांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण सेलचे उपजिल्हा प्रमुख किरण देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. मागील आठवड्यातच मंगलदास बांदल यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात अशाच पद्धतीचा फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोणाची बांदल यांनी फसवणूक केली असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले होते.

किरण देशमुख यांच्या तक्रारीनुसार, देशमुख यांची पुणे नगर महामार्गावर शिरूर तालुक्यातील खंडाळे येथे २१ गुंठे शेती होती. ती विक्री करण्यासंदर्भात देशमुख आणि बांदल यांच्यात २७ लाखांचा व्यवहार ठरला. परंतु प्रत्यक्षात खरेदी खत करताना बांदल यांनी श्रीकांत ज्ञानोबा विरोळे – पाटील आणि राहूल वसंत टाकळकर यांच्या नावाने ते करण्यास देशमुख यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पैसे देतो असेही सांगितले. त्यानुसार १९ मे २०१० रोजी खरेदीखत झाले. त्यानंतर देशमुख २१ मे रोजी बांदल यांच्याकडे गेले. तेव्हा ते घरी नव्हते. त्यानंतर देशमुख यांनी पैशांसंदर्भात विरोळी पाटील आणि साक्षीदार राहूल टाकळकर यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी काही दाद दिली नाही. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला.

मात्र त्यानंतर दोन दिवसांपुर्वी देशमुख यांनी पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांची भेट घेतली. तेव्हा केलेल्या पाठपुराव्यानूसार संदिप पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी रात्री उशीरा शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी