50 कोटींचं खंडणी प्रकरण : राष्ट्रवादीचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल ‘ससून’मध्ये ‘दाखल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नामवंत सराफाला खंडणी प्रकरणी अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते़ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे.
नामवंत सराफाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी २१ मार्च रोजी खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

बांदल यांना काल रात्री आपला घसा दुखत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे.