‘छत्रपती शिवाजी महाराज सूर्य, त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा मी तर कधीच करणार नाही” – मंगलप्रभात लोढा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतापगडावर आज (३० नोव्हेंबर) शिवप्रताप दिन साजरा झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांनी एक विधान केले ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापले होते. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचे उदाहरण दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. आता या वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) म्हणाले,” विरोध काय बोलतात, हा त्यांचा अधिकार आहे. पण जे काही टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे, जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, (ते बोलण्याआधी) मी काय सांगितले, हे त्यांनी बघितलं असेल का? (मी सांगतो) त्यांनी नाही बघितलं. मी तिथे फक्त उदाहरण दिले होते. मी तुलना केली नाही. मी ती करूही शकत नाही. मीच काय इतर कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत आणि आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल मी तर कधीच करणार नाही.”

 

शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मंगल प्रभात लोंढा म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले.
औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं.
शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी.” त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादळ सुरू झाले.
राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका केली होती.

 

Web Title :- MangalPrabhat Lodha | mangalprabhat lodha finally clarified his role on the controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर