तरुणानं तयार केली ‘चमत्कारिक’ गणेश मूर्ती, विसर्जित करताच बनणार ‘रोपटं’ !

पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात येत्या २ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश चतुर्थीच्या वेळी गेणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीची आपल्या घरात स्थापना करतात. अतिशय भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव तब्बल दहा दिवस चालतो. कोणत्याही कार्यक्रमात गणपती हे विद्यचे दैवत असल्यामुळे गणपतीला पहिला मान असतो. गणेश जनमोत्सव गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी दरम्यान साजरा केला जातो. प्रामुख्याने गणेशोत्सव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्त विविध आकर्षक गणेशमूर्ती आपल्या घरी घेऊन येतात. घराघरात मूर्तींचे पूजन केले जाते. दिवसातून दोन वेळ आरती केली जाते. प्रसादाचे वितरण केले जाते. दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे उत्साहात आणि भावुक वातावरणात विसर्जन केले जाते.

समाजमाध्यमांवर इको-फ्रेंडली गणेशमूर्ती घेण्याचे आवाहन
समाजमाध्यमांवर असे अनेक संदेश आढळून येत आहेत ज्यात गणेश मूर्ती या इको फ्रेंडलीच घ्यावेत अशी विनंती करण्यात येत आहे. मंगळूर मध्ये राहणाऱ्या नितीन वाज या तरुणाने कागदाचा लगद्या आणि बियाण्यापासून अद्भुत अशी गणेश मूर्ती तयार केली आहे. ज्याचे विसर्जन करताच एक छोटेशे झाडाचे रोपटे तयार होते. आहे ना इको फ्रेंडली..? आणि नाविन्यपूर्ण ! अर्थातच, यापासून पर्यावरणाला कसल्याही प्रकारची हानी पोचणार नाहीये. असे सांगितले जात आहे की, हि मूर्ती फळे , भाज्या यांच्या बियांपासून तयार केली गेली आहे. या मूर्ती पाण्यामध्ये विरघळून जातात. नितीन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मूर्ती हि जुन्या वर्तमानपत्रांना चुरगळून बनवली गेली आहे. मूर्ती बनवताना आम्ही कुठल्याही विषारी रंगाचा किंवा पदार्थाचा वापर केलेला नाही. मूर्ती मध्ये फळांचे आणि भाज्यांचे बी वापरण्यात आले आहे. मूर्ती पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मूर्तीचे झाडाच्या छोट्या रोपट्यात रूपांतर होईल. समाजमाध्यमांवर याचे खूप कौतुक केले जात असल्याचे नितीन यांनी सांगितले.

नेटकऱ्यांनी केले भरभरून कौतुक
एका सोशल मेडिया वापरकर्त्याने असे लिहिले आहे की, हे अतिशय आश्चर्यकारक आहे. या एका छोट्या प्रयत्ननाने प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. आणखी एकाने लिहिले आहे की, “ओह माय गॉड! आशा करतो की हा प्रयोग यशस्वी ठरेल. नितीन म्हणाले, आम्ही या वर्षी ३०-४० गणेश मूर्ती बनवल्या आहेत. या वर्षी मंगळूर मध्ये एवढी मागणी नाहीये. परंतु आम्हाला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात यामध्ये नक्कीच वाढ होईल.

आरोग्यविषयक वृत्त –