Coronavirus : लिफ्टमध्ये थुंकत होते क्वारंटाईन केलेले 2 विदेशी, , CCTV मध्ये कैद झाली घटना

मंगळूर : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या मंगळुरुमधील कोडेलबेल येथे दोन परदेशी नागरिकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर ते दोघे होम क्वारंटाइन केले गेले होते आणि त्यांना अपार्टमेंटच्या इमारतीत लिफ्टमध्ये थुंकताना पकडले गेले होते. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या दोघांसोबत राहणाऱ्या तीन रूममेटलासुद्धा क्वारंटाइन फॅसिलिटीमध्ये पाठवले गेले आहे. पोलिस आयुक्त पी.एस. हर्षा यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असून पुराव्याअंतर्गत योग्य कारवाई केली जाईल. त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २६९ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, कर्नाटकमध्ये आतापर्यंत एकूण १३ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला असून राज्यभरात संक्रमणाची एकूण आकडेवारी ३५९ आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी आहे आणि असेही म्हटले आहे की जे उल्लंघन करतील त्यांना शिक्षेसह दंड देखील भरावा लागेल.

जिल्ह्यातील लाल बाग येथे पोलिसांनी गुरुवारी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल एका वृद्ध व्यक्तीवरही गुन्हा दाखल केला असून ही घटना देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की ६० च्या आसपास वय असलेला एक माणूस कारमध्ये बसला आहे आणि पोलिसांनी त्याला थांबवल्यावर वाद घालत आहे.

उल्लेखनीय आहे की कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रभारी कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीवरही चर्चा झाली. जिल्हा प्रशासन व वैद्यकीय पथकाने कोविड-१९ पासून उद्भवलेली आव्हाने व धोक्यांबद्दल सांगितले.