ADV

Mangalwar Peth Pune Crime News | पुणे : वाहनांची तोडफोड करुन तरुणाला लुटले, दहशत पसरवणाऱ्या तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mangalwar Peth Pune Crime News | रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेऊन तीन रिक्षा आणि दोन दुचाकींवर लोखंडी रॉड मारुन नुकसान केले (Robbery Case). तसेच हातातील लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार बुधवारी दुपारी दीड ते पावणे दोन दरम्यान मंगळवार पेठेत घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शाहरुख फैय्याज खान (वय-29 रा. सदाआनंद नगर, न्यु मंगळवार पेठ, पुणे) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. यावरुन तीन अनोळखी आरोपींवर आयपीसी 392, 427, 34 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा
दाखल केला आहे.(Mangalwar Peth Pune Crime News)

पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान मंगळवार पेठेतील हिंदुराष्ट्र मंडळाच्या कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले.
त्यांच्यापैकी दोघांच्या हातात लोखंडी रॉड होता. आरोपींनी फिर्यादी यांच्याजवळ येऊन त्यांना कानशिलात मारुन पैशांची मागणी केली.
त्यावेळी फिर्यादी तिथून निघून जात असताना आरोपींनी पुन्हा कानशिलात लगावून त्यांच्या पँन्टच्या खिशातून जबरदस्तीने 750 रुपये काढून घेतले.

त्यानंतर फिर्यादी यांची रिक्षा व इतर दोन रिक्षा तसेच दोन दुचाकींची लोखंडी रॉडने तोडफोड करुन नुकसान केले.
तसेच हातातील लोखंडी रॉड हवेत फिरवून ‘कोई सामने आया तो फोड के रख देंगे, एक एक को खल्लास कर देंगे’ असे
म्हणत दहशत पसरून आरोपी निघून गेले. पसार झालेले आरोपी निष्पन्न झाले असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे
पीएसआय माने यांनी सांगतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल,
सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

TRAI On Alternate Mobile Number | एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरल्यास होईल अडचण, ग्राहकांच्या खिशावर पडणार भार, सरकार वसुल करणार शुल्क

OBC Leader Laxman Hake | उपोषणासाठी अंतरवाली सराटीत निघालेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शी पोलिसांनी घेतले ताब्यात