अकोला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अध्यक्ष पदी मंगलाताई म्हैसने

अकोला :- पोलिसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा अध्यक्ष निलेश किरतकार यांनी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अँड. रूपाली राऊत यांच्याशी चर्चा करून अकोला महानगर अध्यक्ष पदी मंगलाताई सुभाषराव म्हैसने यांची नियुक्ती केली आहे. म्हैसने यांचे सामाजिक कार्य आणि पोलीस बांधवांच्या प्रति काम करण्याची तळमळ पाहून त्यांची या पदी नियुक्ती करण्यात येत आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना म्हैसने म्हणाल्या आपण सदैव पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति काम करू आणि संघटनेच्या नियमांच्या अधीन राहून संघटना वाढी साठी प्रयत्न करू, असा विश्वास यावेळी मंगलाताई म्हैसने यांनी व्यक्त केला.

त्यांच्या नियुक्तीला समस्त पोलीस बॉईज असोसिएशन पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष महेश गावंडे, सचिव संदिप सोनोने, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराज इंगळे, क्रिडा आघाडी जिल्हाध्यक्ष रणजित दादा गावंडे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष पवन पाठक, अकोट तालुकाध्यक्ष अनिल वगारे व समस्त महिला आघाडी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.