‘या’ भारतीयानं स्वप्नात पाहिलं लॉटरी लागल्याच अन् दुसर्‍याच दिवशी जिंकला 23 कोटींचा ‘जॅकपॉट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आबूधाबीमध्ये 23 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला. मंगळुरुच्या 24 वर्षीय मोहम्मद फैयाज यांना आबूधाबीहून फोन आला की त्यांना जॅकपोट लागला आहे. फैयाज यांना 23 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला.

यासंबंधित माहिती देताना फैयाज यांनी सांगितले की या आधी मी 6 वेळा लॉटरीचे तिकीट खरेदी केली होती. परंतू त्यात शेवटी 30 सप्टेंबरला आबूधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टवर बिग तिकीट लॉटरी खरेदी केली.

फैयाज यांनी सांगितले की एक दिवस त्यांना स्वप्न पडले की त्यांना जॅकपॉट लागला आहे आणि दुसऱ्या दिवशी आबूधाबीवरुन त्यांना फोन आला की तुम्हाला जॅकपॉट लागला आहे. तर बिग तिकीटाच्या आयोजकांनी सांगितले की कंपनीने फैयाज यांना जॅकपॉट जिंकल्याची माहिती देण्यासाठी चार वेळा संपर्क साधला परंतू त्यांनी कॉल उचलला नाही. जेव्हा त्यांनी शेवटी कॉल उचलला तेव्हा त्यांना या संबंधित माहिती देण्यात आली.

फैयाज यांनी सांगितले की ते सध्या मुंबईत अकाऊंटेंट म्हणून नोकरी करत आहेत. त्यांच्या कुटूंबात एक बहीण आणि एक भाऊ आहे. कडनीच्या आजाराने त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यांनी सांगितले की लॉटरीतून मिळणारे पैसे भावा बहिणीच्या शिक्षणावर आणि घरावर खर्च करणार.

Visit : Policenama.com