Manipur Violence | अतुलदादा, तुझी बहिणी आई किंवा बायको असती तर…? यशोमती ठाकूर भातखळकरांवर भडकल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Manipur Violence | मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्रावर ताशेरे ओढत काहीतरी करा अन्यथा आम्हाला पावलं उचलावी लागतील, अशा शब्दात इशारा दिला होता. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी सुप्रिम कोर्टावर टीका केली होती. यावरुन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Manipur Violence)

मणिपूर घटनेचे (Manipur Violence) पडसाद आज विधिमंडळात (Legislature) उमटले आहेत. मणिपूर घटनेवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य न केल्याने विरोधी पक्षातील महिला आमदार वर्षा गायकवाड (MLA Varsha Gaikwad), यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी संताप व्यक्त केला आहे. यशोमती ठाकूर मणिपूरमधील घटनेवरुन सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सुप्रीम कोर्टावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रश्न विचारले आहेत. अतुलदादा तुझी बहिण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का? दादा आहेस ना तू? अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा, काही सेन्सेविटी आहे की नाही? राजकारण करण्याच्या काही मर्यादा आहे की नाही? कशातही राजकारण करणार का, असे सवाल ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले अतुल भातखळकर?

अतुल भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे.
सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा.
मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, अशा शब्दांत भातखळकरांनी सुप्रीम कोर्टाला टार्गेट केलं आहे.

Parineeti Chopra | परिणीतीने पापाराझींना दिली हिंट; सांगितले विवाहस्थळाबद्दल…

Kalki 2898 AD First Glimpse | रोमांचकारी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे खरे नाव आले समोर; टीझरने लावली सोशल मीडियावर आग