Manipur Women Violence | मणिपूर मधील महिलांवर झालेल्या निंदनीय घटनेवर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केला रोष

Manipur Women Violence | akshay kumar tweet on manipur violence women paraded naked video says shaken disgusted horrifying
file photo

पोलीसनामा ऑनलाइन – मणिपूरमध्ये दिवसेंदिवस हिंसाचार वाढत चालला आहे. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मणिपूरमधील (Manipur) दोन महिलांसोबत अत्यंत वाईट पद्धतीने करण्यात आलेल्या हिंसाचार (Manipur Women Violence) समोर आला आहे. या महिलांसोबत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून यावर संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त होत आहे. या घटनेवर आता बॉलीवुडमधील (Bollywood News) कलाकारांनी देखील राग व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) ट्वीट करत मणिपूरमधील घटना निंदनीय व लाजिरवाणी (Manipur Women Violence) असल्याचे सांगितले आहे.

अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट (Akshay Kumar Tweet On Manipur) करुन मणिपूर मध्ये दोन महिलांवर घडलेल्या धक्कादायक घटनेवर राग व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट केले आहे की, “हा व्हिडिओ पाहून मी हादरुन गेलो आहे. मणिपूरमध्ये महिलांसोबत घडलेला हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. मला अपेक्षा आहे की या घटनेत ज्या कोणी व्यक्ती गुन्हेगार आहेत त्यांना सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी की पुन्हा कोणी असे घाणेरडे कृत्य करण्याचा विचार देखील करणार नाही.“ अभिनेता अक्षय कुमार यांच्या ट्वीटला अनेकांनी रिप्लाय देत असे व्हावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे.

मणिपुरमध्ये महिलांसोबत घडलेल्या लाजिरवाण्या प्रकाराने सर्वांना हादरवून टाकले आहे. सर्वांनी या गुन्हेगारांना कठीण शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण देश कठोर कारवाईची मागणी करत आहे. बॉलीवुडमधील अनेक कलाकारांनी यावर मत व्यक्त केले आहे. अक्षय कुमार बरोबरच अभिनेत्री ऋचा चढ्डा (Richa Chadha) हिने देखील तिचा राग व्यक्त केला आहे. ऋचाने ट्वीट करत ही घटना लाजिरवाणी, भयानक आणि अराजकता असे लिहित ट्वीट केले आहे. त्याच बरोबर बॉलीवुड अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने देखील सोशल मीडियावर मणिपूरमधील घटनेचा निषेद केला आहे.

उर्मिला मातोंडकर हिने मणिपूर वरील घटनेवर ट्वीट करत लिहिले आहे की, शॉक झाले आहे आणि हादरले आहे.
मणिपूरची ही व्हायरल व्हिडिओ मे महिन्यातील आहे आणि अजून यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्या लोकांना लाज वाटली पाहिजे जांच्याकडे सत्ता आहे आणि आरामात बसले आहे.
आपण भारतीय इथे कधी पोहचणार आहोत? “अशा कडक शब्दात उर्मिला मातोंडकर हिने राग व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत घडलेली घटना ((Manipur Women Violence) देशातील सर्वांना हादरुन टाकणारी आहे.
देशभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जात आहे. यामधील गुन्हेगारांना लवकराच लवकर शिक्षा करण्यात यावी
या मागणीने जोर धरला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi On Manipur) देखील प्रतिक्रिया
दिली असून नाराजी व्यक्त करत कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक

Total
0
Shares
Related Posts