‘ससुराल सिमर का’ फेम मनीष रायसिंहनं केलं ‘नागिन 3’ च्या अभिनेत्रीसोबत लग्न ! (व्हिडीओ)

ससुराल सिमर का अ‍ॅक्टर मनीष रायसिंह आणि नागिन 3 ची अ‍ॅक्ट्रेस संगीता चौहान हे विवाहबंधनात अडकले आहेत. आजच (मंगळवार दि 30 जून 2020) या कपलनं मुंबईतील अंधेरीमधील गुरुद्वारात लग्न केलं आहे. यावेळी हे कपल खूपच सुंदर लुकमध्ये दिसून आलं. दोघांनीही आउटफिटला मॅचिंग फेस मास्कही लावले होते. दोघांनीही पिंक कलरचा मॅचिंग आउटफिट केला होता.

मनीष रायसिंहनं त्याची ससुराल सिमर का मधील कोस्टार अविका गौरच्या वाढदिवशी (30 जून) लग्न केलं आहे. या गिफ्टमुळं अविका खूपच खुश आहे. तिनं सोशवरून दोघांना यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाला कपलच्या भावा-बहिणींची उपस्थिती

मनीष आणि संगीता यांच्या लग्नात फक्त या कपलचे भाऊ बहिण सहभागी झाले होते. महामारीमुळं त्यांच्या पालकांनाही या लग्नात सहभागी होणं जमलं नाही. फक्त 5 ते 6 लोकच सेरमनीत उपस्थित होते. बाकी लोकांनी व्हिडीओ कॉलवर उपस्थिती दाखवली होती. लग्नातील विधी जसं की, मेहंदी, हळदी समारंभ यासाठी सर्व लोक व्हिडीओ कॉलवर उपस्थित होते.

टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती कपलची पहिली भेट

मनीष रायसिंह आणि संगीता चौहान गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मनीष आणि संगीता यांनी एक श्रृंगार स्वाभिमान का या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याचवेळी त्यांची मैत्री झाली होती. यानंतर ते एकमेंकांना डेट करू लागले. लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि व्हिडीओ कॉलवर पालकांना यासाठी मनवलं.