मनीष सिसोदिया यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली :वृत्तसंस्था

आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवावा या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु आहे. आज आठव्या दिवशी देखील हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती ढासळल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विट द्वारे दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या रक्तातील किटॉनची पातळी ७.४ पर्यंत पोहोचली आहे. ही पातळी शून्य असावी लागते. जर जर हि पातळी  २ पेक्षा जास्त असेल तर धोका मनाला जातो.  डॉक्टरांनी  उपोषण चालू असलेल्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन सिसोदियांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना एलएनजीपी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृतीही ढासळली होती, त्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.