Manisha Kayande । निवडणूक आयोगाच्या निर्णयात विरोधाभास आणि चमत्कारीकपणा – शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाचा (Election Commission of India) निर्णय मोठा चमत्कारीक आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयात मोठा विरोधाभास देखील पहायला मिळतो, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या (Shivsena Spokesperson) मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिले आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आपले मत नोंदविले आहे.

भारतात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला असेल ज्यात मोठा विरोधाभास आहे. एकीकडे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)आणि दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) अशी नावे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला देण्यात आली आहेत. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाने शिवसेना नाव मिळत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पित्याच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पक्षाचे नाव मिळत आहे. त्यामुळे यामागे मोठे दबावतंत्र आहे, असे कायंदे म्हणाल्या.

या दरम्यान आणखी एक आनंदाची बाब अशी की, आम्हाला ‘मशाल’ हे चिन्ह (Mashal Symbol) मिळाले असून,
आम्ही ते घराघरांत पोहोचविणार आहोत.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) आम्ही मशाल चिन्हावर जिंकणार आहोत, असे देखील कायंदे म्हणाल्या.

शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दरबारात आहेत.
त्यामुळे अंधेरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाला हंगामी निर्णय घ्यावा लागला.
यात आयोगाने शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्हींच्या वापरावर बंदी आणली आहे.

त्यामुळे थोडक्यात निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव गोठविण्यात आले आहे.
याचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title :- Manisha Kayande । Contradictions and miracles in Election Commission’s decision – Shiv Sena spokesperson Manisha Kayande

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा