मांजर्डे गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीस अटक करण्याची मागणी

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन

तासगाव मधील मांजर्डे येथे शुक्रवारी दि.22 रोजी रात्री लग्नसमारंभाच्या वेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत रविवार दि.24 रोजी विशाल खेडेकर (गाव-आरवडे,ता.तासगाव)व अन्य अनोळखी एक यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थानीं केली आहे. या गुंडांना पकडण्याचे आव्हान तासगाव पोलिसांसमोर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल खेडेकर व एक अनोळखी यांनी शुक्रवारी रात्री मांजर्डे येथे गावदेवाच्या वेळी विशाल खेडेकर व अन्य एकजण अशोक मोहिते यांच्या घराजवळ आले . यानंतर त्यांनी बेंजोचे साहित्य गोळा करतेवेळी  प्रवीण जाधव यांच्या कानपट्टीस पिस्तूल लावले. ते कोण आहेत हे पाहणेसाठी मोहिते व अन्यजन गेले असता दोन अनोळखी माणसे दिसली ,त्यांना तुम्ही कोण आहात, का थांबलात असे विचारताच त्यांनी शिवीगाळ व लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक जण गोल चेहऱ्याचा, दाडी ठेवलेला 30 ते 35 वर्षांचा तरुण होता. त्याने टी शर्ट व जिन पॅन्ट घातली होती व तो शहरी भाषा बोलत होता. त्याने अशोक मोहिते यांच्या दिशेने गोळीबार केला ती गोळी मोहिते यांच्या दोन पायांच्या मध्ये जमिनीत घुसली, व अन्य एकाने हवेत गोळीबार केला. यानंतर जवळच असणाऱ्या पल्सर बाईकवर बसून आरवडेच्या दिशेने निघून गेले.

या घटनेनंतर गावातील संतोष मोहिते, तानाजी मोहिते, रोहित मोहिते व अन्य तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता कोणी सापडले नाही. लाल रंगाची पल्सर मात्र आरवडे येथील अनिल चव्हाण यांच्या घराजवळ टाकून ते पळून गेले. या गाडीची मांजर्डे मधील तरुणांनी तोडफोड केली. याबाबतची तक्रार अशोक मोहिते (गाव-मांजर्डे)यांनी तासगाव पोलिसात दिली आहे. गावकऱ्यांनी या गुंडागर्दी करणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अधिक तपास तासगावचे पोलीस निरीक्षक अजय शिंदकर करीत आहेत.