पत्नी मदतीसाठी ओरडत होती, पण..! अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर मित्राचा धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे कमाईचे सर्व मार्ग बंद झाले डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि निराश होत टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. मुंबईच्या खारघर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केली. दु:खद म्हणजे, मनमीतच्या आत्महत्येनंतर कुणीही त्याच्या पत्नीच्या मदतीसाठी आले नाही. त्याची पत्नी मदतीची याचना करत होती. पण कोरोनाच्या भीतीने कुणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही.

मनमीतच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मित्रांच्या आश्रूंचा बांध फुटलाय. आता मनमीतचा अगदी जवळचा मित्र मनजीत सिंग याने त्या दिवशी मनमीतसोबत नेमके काय घडले हे सांगितले. एका मुलाखतीत मनजीतने सांगितले की, मनमीतने आत्महत्या केली, त्या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्वकाही सामान्य होते. रात्र झाली, तशी मनमीतची पत्नी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागली आणि ती किचनमध्ये बिझी होताच मनमीत त्याच्या खोलीत गेला.

याच दरम्यान खुर्ची पडल्याचा आवाज झाला. त्या आवाजाने मनमीतची पत्नी खोलीकडे धावली. मनमीतने पत्नीच्या ओढणीने स्वत:ला फासावर लटकवलं होतं. पत्नीने ते पाहून त्याचे पाय धरले आणि मदतीसाठी ती जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी आले. पण कोरोनाच्या भीतीमुळे मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. ती ओढणी फाडा, याला खाली काढा, असे ती ओरडत होती. मात्र, कुणीही मनमीतला स्पर्श करण्यास तयार झाले नाही. मनमीतला कोरोना नाही, असे पत्नी ओरडून सांगत होती. पण सगळे जण तिची मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवण्यात गुंग होते. पत्नी मदतीसाठी ओरड होती त्यावेळी मनमीतचा श्वास सुरु होता की नाही, हे माहित नाही. पण माझ्यामते त्याला त्या क्षणी मदत मिळाली असती तर कदाचित तो आज जवित असला असता, असेही मनजीत सिंगने सांगितले.

कर्जामुळे त्याने केली आत्महत्या
लॉकडाऊनमुळे मनमीतचे काम बंद होते. अशातच त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला होता. अनेक महिन्याचे घराचे भाडे थकले होते. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. मनमीतने आदत से मजबूर या शिवाय आणखी काही मालिका व जाहिरातींमध्ये काम केले होते. एका वेबसीरिजमध्ये काम मिळाले असतानाच लॉकडाऊनमुळे या वेबसीरीजचे शुटींगही थांबले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like