2005 मध्ये JNU मध्ये माजी PM मनमोहन सिंह यांना दाखवले होते काळे झेंडे, त्यावेळी काय म्हणाले होते काँग्रेस नेते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या एका माजी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल असलेलं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. उमर खालिद असं ट्विट करणाऱ्या या माजी विद्यार्थ्याचं नाव आहे.

माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता उमर खालिदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मनमोहन सिंग यांना 2005 साली जेएनयुमध्ये त्यांच्या आर्थिक धोरणांबद्दल काळे झेंडे दाखवण्यात आले होते. ही एक मोठी बातमी होती. प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. पुढच्या दिवशीच पीएमओने हस्तक्षेप केला आणि प्रशासनाला सांगितले की, विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये. कारण प्रोटेस्ट करणं त्यांचा संविधानिक अधिकार आहे.”

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि घोषणाबाजीचा तसेच काळ्या झेंड्यांचा सामना करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी भाषणाला सुरुवात केली की, “तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही, परंतु मी तुमच्या व्यक्त होण्याच्या अधिकाराची रक्षा करेन.” उमर खालिदच्या या ट्विटला अभिनेत्री स्वरा भास्करने रिप्लाय केला. स्वरा म्हणाली, “इंडिया आणि न्यू इंडियात हाच फरक होता.”

उमर खालिदने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आव्हान दिलं आहे की, त्यांनी तुकडे-तुकडे स्पीचवर माझ्यावर कोर्टात केस दाखल करावी. त्यानंतर स्पष्ट होईल की कोणी हेट स्पीच दिलं आहे आणि कोण अँटी नॅशनल आहे. खालिदचं हे वक्तव्य अमित शहांच्या दिल्लीतल्या त्या भाषणासंदर्भात होतं ज्यात त्यांनी तुकडे-तुकडे गँगला शिक्षा देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. रविवारी खालिद भारतीय विद्यार्थी संघटनेकडून सीएए आणि एनआरसी विरोधातल्या विद्यार्थी परिषदेत भाग घेण्यासाठी मुंबईत आला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/