राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राज्यसभा कार्यकाळ मागील महिन्यात संपल्यानंतर काँग्रेस आता त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

मदनलाल सैनी यांचे २४ जून रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. मदनलाल सैनी हे सहा महिन्यांपूर्वीच राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे या जागेचा आणखी साडेपाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस या जागेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे सैनी यांच्या निधनानंतर काँग्रेस या जागेवरून मनमोहन सिंग यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

याअगोदर मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, मात्र मित्रपक्ष द्रविड मुन्नेत्र कडगम याने या गोष्टीसाठी स्पष्ट नकार देत तिन्ही जागा स्वतः लढवायच्या ठरवल्या. राजस्थानमध्ये मात्र काँग्रेसचे सरकार असल्याने या जागेवरून काँग्रेसला काहीही अडचण येणार नाही. राज्यात सध्या काँग्रेसचे १०० आमदार असून ११ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांना ही जागा जिंकण्यास अडचण येणार नाही. भाजपचे राज्यात ७२ आमदार असून हि जागा त्यांच्यासाठी आता अवघड आहे. दरम्यान, मागील महिन्यात १४ जून रोजी त्यांचा राज्यसभेमधील कार्यकाळ संपुष्टात आला होता. १५ जून २०१३ ते १४ जून २०१९ हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ होता.

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’