Mann Ki Baat : भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशांस तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणंदेखील आम्ही जाणतो, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केले.

शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे, अशा शब्दांत मोदींनी वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी ‘मनकी बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला.

सध्याचा काळ संकटाचा आहे. मात्र संकटावर मात करण्याची वृत्ती भारतीयांमध्ये आहे. 2020 वर्ष आव्हानात्मक आहे. आपण अम्फान, निसर्गसारख्या चक्रीवादळांचा सामना केला आहे. कोरोना संकटाला तोंड देत आहोत. याशिवाय लडाखमध्ये कुरघोड्या करणाऱ्या शेजाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे, असं मोदी म्हणाले. संपूर्ण जग कोरोन संकटाचा सामाना करत आहे. या काळात भारत जगाची मदत करत आहे. भारतानं कायम बंधुत्वाची भावना जोपासली आहे. कोरोना संकटकाळात ती अधोरेखित झाली आहे. मात्र आम्ही देशाचं सार्वभौमत्व टिवकवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकट आणि सीमेवरील तणावावर भाष्य केलं.

देशाला आत्मनिर्भर करण्याचा मानस पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा व्यक्त केला. लोकलसाठी व्होकल व्हा, या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न देशवासीयांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी नागरिकांच्या समर्पणाची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुम्ही लोकल वस्तू खरेदी करा आणि त्याच्या प्रसारासाठी शक्य तितके प्रयत्न कार. ही देखील देशसेवाच आहे. आत्मनिर्भर भारत हीच देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनाचं संकट वाढत आहे, त्यावर आपण अनेकदा बोललो आहोत. अनेकांना वाटतंय की हे वर्ष कधी संपेल. कुणी म्हणतंय की हे वर्ष शुभ नाही. लोकांना वाटतंय की हे वर्ष लवकर संपावं. अशा चर्चा का होत आहेत याचा विचार करतो तेव्हा महाल हेच वाटतं की कोरोनाचं संकट हेच यामागचं कारण आहे.

कोरोनाचं संकट येणार हे आपल्याला सहा-सात महिन्यांपूर्वी ठाऊक होतं ? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलं आहे. कितीही संकट आली तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देतो आहे. हे वर्ष अशुभ नाही हे लक्षात घ्या. एका वर्षात एक आव्हान येओ किंवा 50 आव्हानं येवोत डगमगून जायचं नाही हे भारताचं वैशिष्ट्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like