Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा मासिक रेडियो कार्यक्रम मन की बात (Mann Ki Baat Today) द्वारे राष्ट्राला संबोधित केले. (Mann Ki Baat Today) पीएम मोदी यांनी म्हटले, सरकार आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने अमृत महोत्सवाशी संबंधीत कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे की, 15 ऑगस्टला जास्तीत जास्त भारतीयांनी मिळून राष्ट्रगीत गावे, यासाठी एक website सुद्धा बनवली आहे. अमृत महोत्सव सरकारचा कार्यक्रम नाही, कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, तो कोटी-कोटी भारतीयांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आज भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करायचे आहे.

पीएम मोदी म्हणाले, यावेळी 15 ऑगस्टला देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करत आहे. हे आपले सौभाग्य आहे की ज्या स्वातंत्र्यासाठी देशाने अनेक वर्ष प्रतिक्षा केली, त्यास 75 वर्ष होत असल्याचे आपण साक्षीदार होत आहोत. तुम्हाला आठवत असेल 75 वर्ष साजरे करण्यासाठी 12 मार्चला बापूंच्या साबरमती आश्रमातून अमृत महोत्सवाची सुरुवात झाली होती.

पीएम मोदी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी काही अद्भुत छायाचित्रे, काही आठवणींचे क्षण, अजूनही माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. यासाठी यावेळी मन की बातची सुरुवात त्याच क्षणांसोबत करूयात. टोकियो ऑलंम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना पाहून मीच नव्हे तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता.

Mann Ki Baat Today | prime minister narendra modi to address monthly radio programme mann ki baat today

काय म्हणाले मोदी…

– उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमधील महिलांनी केळ्याच्या खोडापासून फायबर बनवण्याचे काम सुरू केले आहे. वेस्टमधून बेस्ट करण्याचे हे काम आहे. या फायबरने चटई, दरी अनेक गोष्टी बनवता येतात.

– आदिवासी समाजात बोर खुप लोकप्रिय आहे. ते याची शेती करतात. कोरोना महामारीत ही शेती वाढत आहे. त्रिपुराच्या उनाकोटीच्या अशाच 32 वर्षाचा तरूण बिक्रमजीत चकमाने बोरांची शेती केली आणि नफा कमावला. आता तो लोकांना प्रेरित करत आहे.

– सध्या देशात 6 वेगवेगळ्या ठिकाणी लाईट हाऊस प्रोजेक्टवर वेगाने काम सुरू आहे. यामध्ये
आधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेटिव्ह पद्धत वापरली जात आहे. यामुळे कन्स्ट्रक्शनचा वेळ कमी होत
आहे. सोबतच घरे बनवली तर ती जास्त टिकाऊ आणि स्वस्त, आरामदायक होतात. मी नुकतीच
ड्रोनद्वारे या प्रोजेक्टचे अवलोकन केले आणि प्रगती लाइव्ह पाहिली.

– 7 ऑगस्टला National Handloom Day आहे. 2014 नंतर मन की बात मध्ये आपण खादीवर सतत बोलत आहोत. यामुळे आज देशात खादीची व्रिकी अनेक पटीने वाढली आहे.

– काही दिवसांपूर्वीच MyGov कडून मन की बातच्या श्रोत्यांचा एक स्टडी करण्यात आला होता. या
स्टडीत आढळले की मन की बातसाठी संदेश आणि सूचना पाठवणार्‍यांमध्ये 75 टक्के लोक 35
वर्षाच्या वयापेक्षा कमी आहेत. याचा अर्थ भारताची युवाशक्ती मन की बातला दिशा देत आहे.

– पीएम मोदी म्हणाले, मन की बात एक असे माध्यम आहे, जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता
आहे. मन की बातमध्ये आपण पॉझिटिव्ह चर्चा करतो. सकारात्मक विचार आणि सूचनांसाठी
भारतातील तरूणांची ही सक्रियता मला आनंदी करते. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मन की
बातच्या माध्यमातून मला तरूणांची मने जाणण्याची संधी मिळते.

हे देखील वाचा

Cylinder Blast | अहमदाबादमध्ये सिलिंडरच्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश

Raj Kendra Porn Film Case | राज कुंद्राविषयी माहिती देणार्‍या अभिनेत्रीला गुन्हे शाखेचे समन्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mann Ki Baat Today | prime minister narendra modi to address monthly radio programme mann ki baat today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update