Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune | शंभराव्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण पुणे शहरात 1000 ठिकाणी – जगदीश मुळीक

पुणे : Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना उद्देशून “मन की बात” (Mann Ki Baat) कार्यक्रम आयोजित करतात. भारतातील नागरिक मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम ऐकत असतात. देशामध्ये घडणाऱ्या अनेक घटना तसेच विविध नागरिक अथवा विविध समूह यांनी केलेले विशेष कार्य या कार्यक्रमाद्वारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासी यांपर्यंत पोहोचवत असतात. या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण जगभर होते आहे. येत्या रविवारी ३० तारखेला सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या या अनोख्या व संपूर्ण देशभर तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या उपक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. पुणे शहरात या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण १००० ठिकाणी आयोजित करण्याचे पुणे शहर भाजपाने (Pune BJP) ठरवले आहे अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिली. (Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune)

पुणे शहरातील प्रत्येक बुथवर या कार्यक्रमाचे जाहीर प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच विविध सोसायटी,
गणेश मंडळ व अनेक संस्था यांच्या माध्यमातून हा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील सर्व नागरिकांनी या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणात सहभागी व्हावे असे आवाहन
पुणे शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे. (Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune)

Web Title :-  Mann ki Baat’s 100th Episode Promotion In Pune | Broadcasting of 100th ‘Mann Ki Baat’ program at 1000 locations in Pune city – Jagdish Mulik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | सुप्रिम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, अ‍ॅड. आशिष गिरी यांची ‘ती’ याचिका फेटाळली

Maharashtra Politics News | ‘हपापलेपणा कोण करतंय?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ ट्विटवर ठाकरे गटाचा पलटवार