पीएचडी सोडून दहशतवादी झालेल्या मन्नान वानीचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था 

काश्मीर मधील हंदवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत ‘हिज्बूल मुजाहिद्दीन’ दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याच्यासह दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. मन्नान (वय २७) हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. तो पीएचडी सोडून दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f06b568f-cd64-11e8-a063-e577c667be9a’]

याबाबत सविस्तर माहिती, श्रीनगर पासून ८० किलोमीटरवर असलेल्या लांगटे येथे एका घरात २ दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. यामध्ये हिज्बूल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर मन्नानसह दोघांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मन्नान वानी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी गोळाबार केला आणि चकमकीत त्यांचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B071HC9KBN,B07118GW9V,B0716G2RDX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff6ce3f3-cd64-11e8-896d-b583673e755c’]

दरम्यान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठतील पीएचडी चा विद्यार्थी मन्नान काही महिन्यांपूर्वी हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याने खळबळ उडाली होती. विद्यापीठातून बेपत्ता झाल्यावर काही दिवसांत एके – ४७ रायफल हातात घेतलेले त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

वानी याच्या मृत्यूनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबी मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उच्चशिक्षित तरुण दहशतवादाच्या मार्गावर जात आहेत. हा चिंतेचा विषय आहे. मन्नान वानीचा मृत्यू हे काश्मीरचे मोठे नुकसान असून त्याच्यासारखे तरुण या मार्गाला का जात आहेत ? याचा सरकारने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. काश्मीर खोऱ्यातील शांततेसाठी पाकिस्तान सोबत चर्चा हा एकमेव मार्ग असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी ट्विटरवरु केला.
Loading...
You might also like