आम्ही ‘भारत माता की जय’ म्हणतो पण काँग्रेस ‘सोनिया माता की जय’ असं म्हणते !

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी सांगितले की, ‘मोदी सरकारने जगभरात भारताचे वजन आणि प्रतिष्ठा वाढवली आहे कारण देश आमच्यासाठी नेहमीच सर्वोपरि आहे. तर कॉंग्रेस मात्र नेहरू-गांधी परिवारापुढे विचार करू शकत नाही. अंबाला जिल्ह्यातील नारायणगढ येथे निवडणूक सभेला संबोधित करताना खट्टर म्हणाले, “कोणास प्राधान्य दिले पाहिजे याचा विचार करतो तेव्हा आपण असे म्हणतो की देश नेहमीच प्रथम येतो. दुसरीकडे कॉंग्रेस मात्र आपल्या नेत्यांना प्रथम स्थान देते. आम्ही भारत माता की जय म्हणतो, पण कॉंग्रेसमधील काही लोक सोनिया माता की जय असे म्हणतात. ‘

ते म्हणाले की, ‘ एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, त्यात गुडगावचे कॉंग्रेसचे उमेदवार असे बोलताना ऐकले की गुडगाव आता भारत माता की जय बोलणार नाही आणि लोक फक्त सोनिया माता की जय बोलतील. मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, कॉंग्रेस यापुढे हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगू शकत नाही कारण ‘यामुळे सोनिया गांधींना त्रास होईल, आणि जर त्यांनी ती योग्य असल्याचे म्हटले तर मात्र लोक चिडतील.’

नेहरू-गांधी परिवारासमोर कॉंग्रेस विचार करूच शकत नाही :
सीएम खट्टर म्हणाले की, नेहरू-गांधी परिवारापुढे कॉंग्रेस विचार करू शकत नाही. याचा दाखल देताना ते म्हणाले, ‘तत्कालीन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे आणि नवा प्रमुख गांधी घराण्यापलीकडची व्यक्ती असेल. कॉंग्रेसला ठरवायला दोन महिने लागले परंतु त्यांना या कुटूंबाबाहेर कोणताही पात्र व्यक्ती सापडला नाही आणि सोनिया गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्यात आले.’

पंतप्रधान मोदींनी जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवली :
तथापि, यावेळी मनोहर लाल खट्टर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचे वजन आणि प्रतिष्ठा वाढवली आहे आणि अमेरिकेच्या ह्युस्टन येथे हावडी मोदी कार्यक्रमात ते दिसून आले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘बडे देशही मोदीजींशी संपर्क साधतात आणि धोरणे व योजना बनविण्याचा त्यांचा सल्ला घेतात.’ त्यानंतर पुढे ” हॉस्टन समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सहभागाचा हवाला देताना ते आता जगातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत,” असेही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना जेवढा आदर दिला तितका अन्य कोणाला दिला नाही.

Visit : Policenama.com