Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Manohar Mama Bhosale | मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले (Manohar Mama Bhosale) (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला करमाळा कोर्टाकडून (Karmala Court) 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) सुनावली. त्यामुळे येत्या 27 सप्टेंबरपर्यंत मनोहर भोसले पोलीस कोठडीत आहे. महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसात ते अटकेत आहेत. तर, गुरूवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मनोहर भोसले यांच्या छातीत दुखु लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे

आर्थिक फसवणूक प्रकरणी बारामती येथे व करमाळा पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी सालपे येथून पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतले. त्यांनतर 11 सप्टेंबर रोजी बारामती कोर्टात हजर केले. यावेळी त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्यांनतर 19 सप्टेंबर पर्यंत कोठडी वाढवण्यात आली.

दरम्यान, मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांत आणले. त्यांनतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यानस 23 सप्टेंबर रोजी (गुरुवारी) रात्री 11.30 वाजता मनोहर भोसले यांना अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना येथील उपजिल्हा रूणालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रात्रीच्या दरम्यान दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Thane Gang Rape | 8 महिन्यापर्यंत प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केला गँगरेप, 33 जणांवर गुन्हा दाखल, 26 जणांना पोलिसांकडून अटक

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Manohar Mama Bhosale | manohar mama bhosale chest began ache admitted solapur treatment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update