Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

करमाळा : पोलीसनामा ऑनलाइन – थाकथित महाराज मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) याच्या विरोधात आज सकाळी बारामती पोलीस ठाण्यात (Baramati) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल्यानंतर आता करमाळा पोलीस ठाण्यात (Karmala Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) याच्याविरुद्ध बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसलेच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

अलिकडेच मनोहर मामा भोसले याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. उंदरगाव येथे भोसले यांचा बाळूमामा (Saint Balu Mala) यांच्या नावाने महत्व मंदिर आहे. या मठामध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.

भोसले याच्यावर फसवणुकीचे (Cheating) अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आता एका महिलेने लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 376 2N, 376 d, 354, 385 व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता मनोहर मामा भोसलेच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले आहेत.

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन इतर सहकाऱ्यांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडरा देत त्यांनी फसवणूक केली.
याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा,
जादूटोणा आणि उच्चाटन कयदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Titel :- Manohar Mama Bhosale | rape case filed against manohar mama bhosle live preparations for arrest underway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Social Media | उकळत्या पाण्यात हात जोडून बसला निष्पाप बालक, 23 सेकंदाच्या Video ने लोकांना केले ‘हैराण’

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे