मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती अद्यापही गंभीर

पणजी : वृत्तसंस्था
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत. एम्समधून हलवल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे. त्या फोटोंमधून मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळतंय.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0592fdad-cfa6-11e8-8b25-d995afd9f7d1′]
स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे त्यांना 15 सप्टेंबर रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले 28 दिवस त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. दाबोळी विमानतळावरून पर्रीकर यांना थेट त्यांच्या दोनापॉल येथील घरी नेण्यात आले. तेथे रुग्णवाहिका, औषधांची सामुग्री असलेली व्हॅन सज्ज आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर व डॉक्टरांचे पथक तेथे आहे.
एम्स सुत्रांच्या माहितीनुसार, सकाळी पर्रिकरांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना काही काळ आयसीयूत ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. ६२ वर्षीय पर्रिकर १५ सप्टेंबरपासून दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांना एका विशेष एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतून गोव्याला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पणजीतील आपल्या खासगी घरी राहतील.
[amazon_link asins=’B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c8a0c80-cfa6-11e8-99d2-7f4da7fd535d’]
प्रकृती बिघडलेली असल्याने बऱ्याच काळापासून गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात पर्रिकरांना उपस्थित राहता आलेले नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी शुक्रवारी त्यांनी गोवा भाजपाच्या कोर कमिटीची तसेच सहकारी पक्षांची बैठक एम्समध्ये बोलावली होती.
दरम्यान, भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी राज्यात कोणताही नेतृत्व बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी देखील गोव्यामध्ये पर्रिकरच मुख्यमंत्री असतील, असे सांगितले होते. फेब्रुवारी महिन्यापासून पर्रिकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. गोव्यासह, मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिकेतील रुग्णालय तसेच आता दिल्लीतील एम्स रुग्णालय अशा विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3083e0c1-cfa6-11e8-82dc-7978b89c4c24′]