‘म्हणून’ पर्रीकरांच्या निधनापूर्वी भाजप मुख्यालयात करण्यात आले ‘कुराण पठण’ 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल संध्याकाळी दुःखद बातमी आली .  त्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली . गोव्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले . त्यांच्या निधनापूर्वी त्यांची व्रकृती अधिकच खालावली असल्याचे समजताच भाजप मुख्यालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून कुराण पठण करण्यात आले होते.
गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्करोगाशी सामना करत होते .  शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली प्रकृती खालावल्याचे

वृत्त कळताच भाजप मुख्यलायामध्ये दहा मौलाना यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून पवित्र ‘कुराण’ पठण केले होते. इतकेच नव्हे तर ,  राज्याचे आर्चबिशप फादर फिलिप नेरी फेर्राव यांनी देखील ख्रिश्चन समाजाला प्रार्थना करावी असे सांगण्यात आले होते . मात्र कोणत्याही प्रकारची प्रार्थना कामाला न येता शनिवारी रात्रीपर्यंत आजाराशी झुंज देता-देता पर्रीकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने , गोवा राज्यावरच नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

मनोहर गोपालकृष्णप्रभू पर्रीकर
१३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे त्यांचा जन्म झाला . त्यांनी शालेय शिक्षण मडगावातील लोयोला हायस्कूलमधून घेतले . ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकते होते .  मुंबईतील अभियांत्रिकी महाविद्यालयातून आयआयटीचे शिक्षण घेतले .  आयआयटी पदवी घेणारे ते गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री होते . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकते ते मुख्यमंत्री पद असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे . राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वप्रथम भाजपच्या उमेदवारीवर ते विधानसभेत निवडून आले होते.

त्यांनी २४ ऑक्टोबर २००० मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहिल्यांदा शपथ घेतली . तब्बल चार वेळा ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री होते . इतकेच नव्हे तर , त्यांनी देशाचे सरंक्षण मंत्री म्हणूनही कारभार सांभाळला होता .  याचदरम्यान झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेयही संरक्षण मंत्री म्हणून त्यांनाच  जाते.