पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा; भाजपच्या आमदारांची तातडीची बैठक  

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत काही दिवसांपासून चढउतार होताना सर्वांनी पाहिले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती जैसे थे आहे. पर्रिकरांच्या प्रकृतीमुळे गोव्यातील सत्तेत पोकळी निर्माण झाली आहे. तसंच सत्तेतील कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची टीकाही विरोधकांनी केली होती.

त्यानंतर आज गोव्यात भाजपच्या आमदारांची तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. सकाळी १० वाजता पणजीमधील भाजपच्या मुख्य कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे.

मनोहप पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. २३ फेब्रुवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पोटामध्ये रक्तस्राव झाल्यानं त्यांना तातडीनं गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनतर देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना गोव्यात बोलावण्यात आलं. एम्समधील डॉक्टरानी त्यांच्या काही औषधांमध्ये बदल केला आहे.

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पर्रिकर यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर पर्रिकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. देशाच्या राजकारणात तसंच पक्षातील त्यांच्या कामाचे सतत कौतुक होत असते.  

https://twitter.com/ANI/status/1099354370146217985