Manoj Bajpayee | अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन; वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन : Manoj Bajpayee | गेल्याच वर्षी 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचे निधन झाले होते, तर आता मनोज यांनी त्यांच्या आईलादेखील गमावले आहे. आई गीतादेवी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गीतादेवी यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. दिल्ली येथील मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज यांच्या आईवर गेल्या एका आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती खालावली. मनोज हे रुग्णालयात आपल्या आईसोबतच होते आणि काल गीतादेवी यांची प्राणज्योत माळवली.

मनोज यांनी याआधी अनेक मुलाखतींमध्येदेखील सांगितले होते की, त्याची ताकद शक्ती व आधारस्तंभ ही
त्याची आई आहे. गीतादेवी यांच्या पश्चात तीन मुली व तीन मुलं असा परिवार आहे.
गेल्या वर्षी 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात मनोज यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
आईच्या अचानक जाण्याने मनोज यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :- Manoj Bajpayee | actor manoj bajpayee mother geeta devi passes away at the age of 80 in delhi hospital see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना