मनोज वाजपेयीनं कंगनाला दिलं ‘ठासून’ उत्तर, म्हणाला – ‘जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कंगना राणौत सध्या तिच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबई महापालिका आणि शिवसेनेसोबतच्या वादासोबतच कंगना इंडस्ट्रीबाबतही असं खूप काही वाईट बोलत आहे. जे अनेकांना आवडलेले नाही. कंगनाने काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात संपूर्ण इंडस्ट्रीला दोषी ठरवलं होतं. कांगनाने ट्विट करत इंडस्ट्रीतील पार्टीमध्ये कोकोने सर्वात पॉप्युलर ड्रग असल्याचे म्हटले होते. या पार्टीजमध्ये पाण्यात MDMA मिश्रित करुन दिलं जात. तेही तुम्हाला न सांगता, आता या पूर्ण प्रकरणावर मनोज वाजपेयीने सडेतोड उत्तर दिलं असून तेही मार्मिकपणे.

जे घडतंय त्यात स्वार्थ
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज वाजपेयी याने सांगितले की, हे फारच चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीला जनरलाइज करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं यामागे कुणाचातरी स्वार्थ आहे. मी मुळात इंडस्ट्रीला डिफेंड करत नाही. पण इथे वाईट लोक आहेत तर काही चांगले देखील लोक आहेत.

इथे ड्रग्सचा व्यापार आहे
मनोज वाजपेयीने सांगितले की, इथे प्रत्येक प्रकारचे लोक आहेत. मला वाईट लोकही भेटतात. पण त्यांना न भेटताही मी त्यांच्याशी डील करतो. त्यांच्याशी भांडतो आणि भांडत राहणार. पण जसे इतर क्षेत्रात आहेत तसेच लोक इथेही आहेत. मात्र, जसं तुम्ही म्हणता की, इथे ड्रग्सचा व्यापार आहे. तर जे लोक हे बघत आहेत ते मला बघतात आणि त्यांना वाटतं की, ड्रग्सची गोदाम येत आहे, त्यांना असं वाटतं की जणू मनोज वाजपेयी कांचा सेठ आहे.

कुछ गलत हो रहा है यहां
मनोज वाजपेयी पुढे म्हणाला, मला वाटतं जे काही सुरु आहे त्यात कुणाचातरी स्वार्थ आहे. जे बोललं जात आहे त्यात अनेक कारणं दडलेली आहे. शूल सिनेमात माझा एक डायलॉग होती की, कुछ गलत हो रहा है यहां, अंधे है आपलोग जो आपको ये दिखाई नही देता है. आणि मला आज सर्वांना सांगायचयं की, हे जे दाखवलं जात आहे. गोष्ट केवळ तेवढी नाही. हे एखाद्या उद्देशाने केलं जात आहे, हा उद्देश शोधावा लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like