Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूडमधील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हा विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. मनोजने आज त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी वेगळीच जागा निर्माण केली आहे. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात राज करत असतात. आता मनोज (Manoj Bajpayee) ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचे ठसे उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

याआधी देखील मनोजने प्राईम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीज मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता मनोज हॉटस्टार वर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याला राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला यावर त्यांनी केलेले वक्तव्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना मनोज (Manoj Bajpayee) म्हणाला, “तो खूपच हटके माणूस आहे.‘सत्या’, ‘शिवा’, ‘रंगीला’, ‘शूल’, ‘कंपनी’
यासारखे चित्रपट देऊन त्यांनी चित्रपटसृष्टीचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.
एवढेच नाही त्यांनी आजवर चित्रपटसृष्टीला कित्येक उत्तम नट आणि सहाय्यक दिग्दर्शक दिले आहेत.
माझ्या मते अशी हटके विचारसरणी करणारी माणसे फारच कमी आणि हिम्मतवान असतात.

त्यापुढे त्यांना विचारण्यात आले होते की “राम गोपाल वर्मा हे सध्या चित्रपट का काढत नाहीत?”
यावर बोलताना मनोज म्हणाला, “हा खूपच उत्तम प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवं.
माझ्यामते तो स्वतःच्या मनाचा राजा आहे.
त्याला जे योग्य वाटेल तो तेच करतो आणि तो एक उत्तम आणि स्वतःच्या
तत्त्वांशी प्रामाणिक असणारा दिग्दर्शक आहे. त्याची विचारसरणी फार वेगळी आहे.
आपण जरी त्या मतांशी एकजूट नसलो तरी देखील एक दिग्दर्शक म्हणून त्याच्याशी बोलताना फार बरं वाटतं”.
हॉटस्टार वर मनोज यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात मनोज बाजपेयीसह ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.

Web Title :- Manoj Bajpayee | manoj bajpayee speaks about experience working with director ram gopal varma

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

WTC Final | इंदूर कसोटीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ऑनलाईन नोंदणी केलेल्या 15 हजार शेतकऱ्यांचे धान पडून; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ