
Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली
जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange-Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. सर्व आंदोलकांशी जरांगे यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी उपोषण का स्थगित करत आहोत याबाबत उपस्थितांना माहिती दिली आणि आंदोलनाची पुढील दिशा देखील स्पष्ट केली. (Manoj Jarange-Maratha Reservation)
मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्य सरकारला सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर ठोस उपाय काढता आलेला नाही. एक महिन्याच्या मुदतीवर सरकार ठाम असून मराठा आरक्षणप्रश्नी तातडीने जीआर (अधिसूचना) काढता येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. (Manoj Jarange-Maratha Reservation)
दरम्यान, टिकणारे आरक्षण हवे असेल तर एक महिन्याचा कालावधी द्या, अशी विनंती सरकारने केली होती. ही विनंती मनोज जरांगे यांनी मान्य केली आहे. मात्र, जरांगे यांनी सरकारसमोर याबदल्यात काही अटी ठेवल्या आहेत. तसेच कालावधी किती लागेल, इत्यादीबाबत लेखी द्यावे, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, अनेक तज्ज्ञांनी, निवृत्त न्यायाधीशांनी सल्ला दिला की मोठ्या ताकदीने आंदोलन उभे केले आहे, त्याचे सोने केले पाहिजे. त्यामुळे आपण हे आंदोलन सुरू ठेवायला हवे. तज्ज्ञ सांगतात की उपोषण एक महिन्यासाठी मागे घ्या, सरकारला ३० दिवसांची मुदत द्या. ३१ व्या दिवशी आरक्षण मिळाले नाही तर मग उपोषणाला बसा. परंतु या ३० दिवसात आंदोलन सुरूच ठेवा. गावागावात आणि अंतरवाली सराटीत सुद्धा आंदोलन सुरूच ठेवा.
जरांगे पाटील म्हणाले, सरकारला ३० दिवसांची मुदत देऊ. आंदोलन सुरूच राहील. हे आंदोलन कायमचे मागे घेतले तर मग आपला अवतार संपला म्हणून समजा. आमरण उपोषण एक महिन्यासाठी मागे घ्या, असे राज्य सरकार सांगत आहे. एक महिन्यात आरक्षण नाही दिले तर ते तोंडावर पडतील. त्यामुळे उपोषण मागे घेतले तरी आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील.
सरकारला एक महिन्याचा वेळ दिला तरी मी ही जागा सोडणार नाही. तुमच्या हातात जातप्रमाणपत्र मिळत नाही तोवर मी मागे हटणार नाही. सरकारला ४० वर्षं दिली आहेत, आता एक महिना देऊ. जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना विचारले की राज्य सरकारला एक महिना द्यायचा का? त्यावर सर्व आंदोलकांनी होकार दर्शवला.
मनोज जरांगे म्हणाले, मी तुमचा सर्वांचा आहे, माझ्यावर शंका घेऊ नका. समाजावर डाग लागू नये, कोणी बदनाम करू नये, सरकारला एक महिना दिला नाही म्हणून कणी काही बोलू नये म्हणून मी दोन पावले मागे जातोय. केवळ जातीसाठी दोन पावले मागे जातोय. परंतु, ३१ व्या दिवशी परत आमरण उपोषण करेन. त्यानंतर सलाईन, पाणी किंवा काहीच घेणार नाही. मी उपोषण सोडायला तयार आहे पण ही जागा सोडायला तयार नाही. ३१ व्या दिवशी आरक्षण नाही दिलं तर सगळ्या मंत्र्यांना महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही.
जरांगे यांनी सरकार समोर ठेवलेल्या ५ अटी
१. अहवाल कसाही येवो, मराठ्यांना ३१ व्या दिवशी राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची. हे मला आज लेखी द्यायचे.
२. मराठा आंदोलनात महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झालेत ते सर्व मागे घ्या.
३. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा.
४. उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे उपस्थित हवेत. सरकार आणि मराठा समाजाच्या मध्ये दोन्ही राजे उपस्थित असावे.
५. मुख्यमंत्री किंवा सरकारने हे सर्व लेखी लिहून द्यावे, सरकारने कालावधी सांगावा.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे. मी सरकारला येथे बोलावत आहे.
सरकार येथे आले तरी जसे आले तसे परत गेले पाहिजे. आपल्यावर कुठलाही डाग लागू द्यायचा नाही.
मराठे बोलवतात आणि त्यानंतर फसवतात असा दगाफटका करायचा नाही.
दूरदृष्टी ठेवल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.
जरांगे-पाटील पुढे म्हणाले, सरकारने मान्य केले नाही तर आजपासून पुढील महिन्याच्या १२ तारखेला शंभर एकरात विराट
सभा घ्यायची. ट्रॅक्टर, ट्रॉली भरून माणसे आणायची. मराठा नाव घेतले थरकाप उडाला पाहिजे, इतकी मोठी सभा घ्यायची.
उपोषण सोडले तरी आंदोलन सुरू राहील. आमरण उपोषणाचे साखळीत रुपांतर करा,
मी लेकराचे तोंड बघणार नाही, घरचा उंबरठा ओलांडणार नाही.
जरांगे म्हणाले, सरकार येथे आले तर शांतता राखायची. अजिबात कुठलेही आंदोलन करायचे नाही.
बोलावून धोका करायचा नाही. तुमच्या शब्दावर या ५ प्रश्नांची उत्तरे सरकारकडून घ्यावी.
आमरण उपोषण मागे घेऊ. साखळी उपोषण सुरू करू. आंदोलनाची प्रतिष्ठा घालवायची नाही.
मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, दिल्लीत शेतकरी ८ महिने आंदोलनाला बसले होते.
आता आपण १ महिना सरकारला देऊ. भारतात अशी सभा घ्यायची जी याआधी कधीच झाली नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व
कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले
कोंढवा परिसरात ‘भाईगिरी’ करणाऱ्या गणेश कोरडे याच्यासह इतर 2 जणांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 60 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA