Manoj Jarange Patil | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या जालना भेटीबाबत मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज सायंकाळी जालन्यात दाखल होत आहेत. याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून उपोषण सोडण्याबाबत भाष्य केल आहे. (Manoj Jarange Patil)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जालन्यात येणार आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, काही हरकत नाही, त्यांनी मला भेटायला यावे. मात्र, ते भेटायला येणार आहेत की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचे मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे. ते येथे आल्यावर त्यांच्याशी मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करू. (Manoj Jarange Patil)

उपोषण सोडणार का, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मराठा समाजाला ३० दिवसात आरक्षण मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिले तरी आम्ही ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला आहे, असे जरांगे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’,
‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”