Manoj Jarange Patil | मनोज जरागेंचं उपोषण स्थगित; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil | मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. (Maratha Reservation Andolan)

राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज अंतरावाली सराटी येथे पोहोचत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.(Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे.
तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन
उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी