Manoj Jarange Patil | धक्कादायक! मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, मला सलाईनमध्ये विष…

जालना : मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, उपोषणात मरण यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझा एन्काउंटर करण्याचा विचार करत आहेत, असे गंभीर आरोप मराठा (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ते आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते.

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचा राज्यात पुन्हा एकदा दरारा निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी आज तुम्हाला सगळे काही सांगणार आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. मी सागर बंगल्यावर येतो. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही.

मनोज जरांगे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातील दोन आणि अंबड तालुक्यातील एकजण नारायण राणेंनी उचलून नेला आहे. त्यांच्या माध्यमातून आता पत्रकार परिषदा चालू होणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नको सांगितलं तर नारायण राणेंची असं काही करण्याची हिंमत नाही. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 27 फेब्रुवारीपासून आयोजन !