Manoj Jarange Patil | जरांगेंच्या वक्तव्याने संभ्रम, म्हणाले ”आरक्षण दोन दिवस उशिराने मिळाले तरी चालेल, पण…”

यवतमाळ : उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Winter Session Nagpur) सुरू होत आहे. या अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे. त्यातच मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. अशावेळी मनोज जरांगे यांनीच, आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल. परंतु, सर्व शांततेने करू, असे वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच राजकीय वर्तुळात देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, नंतर जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, आज पुसद येथे मनोज जरांगे, ओबीसी, धनगर आणि बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांच्या आधीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

मनोज जरांगे म्हणाले, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही. शब्दश: अर्थ घेऊ नका. समाज मोठा आहे.
समाजासोबत संवाद साधताना बोली भाषेतील शब्द वापरणे गरजेचे असते. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले. दोन दिवस उशीरा याचा शब्दश: अर्थ घेऊ नका. डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही. बोलीभाषेतील शब्द वापरल्याने गैरसमज होऊ देऊ नका. २४ डिसेंबरची डेडलाईन कायम आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मराठा आणि ओबीसी (OBC Reservation) आता एकत्रितपणे
काम करणार आहेत. यावर पुसदच्या बैठकीत चर्चा झाली. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवे
ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवे.

मनोज जरांगे म्हणाले, कुणबी नोंदी सापडत असून, आतापर्यंत ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले.
कोणी कितीही विरोध केला तरी मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणार आहे.
शांततेच्या आंदोलनात ताकद आहे, शांततेच्या आंदोलनाने मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले.
त्यामुळे यापुढेही एकजूट दाखवा, शांत राहा, कुठेही उद्रेक, जाळपोळ करू नका, कोणी कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला
तरी आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल