Manoj Jarange Patil | अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तो भोंदू महाराज, मनोज जरांगेंचा अरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) एक माणून अंतरवाली सराटीमधील माहिती त्यांना देतो, तो मला माहित आहे, अशी माहित आज मराठा (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिली. यानंतर काही तासातच त्यांचे जुने सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Barskar) यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान, जरांगे यांनी या आरोपांवर खुलासा केला असून अजय बारस्कर हा सरकारचा ट्रॅप असून तो भोंदू महाराज असल्याचे म्हटले आहे.

आज अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.(Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे म्हणाले, अजय महाराज बारस्कर यांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठे व्हायचे होते. तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका. अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे. आंदोलन संपवण्याचा घाट आहे. या बाबाला उत्तरे देणार नाही, काय बोंबलायचे ते बोंबल, अन्यथा याला वेगळे वळण लागू शकते.(Manoj Jarange Patil)

जरांगे म्हणाले, एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप आहे. प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होते, ते मिळाले नसेल. त्यांना ट्रॅप करायचा होता. त्यात शिंदे यांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे यांचा प्रवक्ता आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता, असे जरांगे म्हणाले.

बारस्कर यांनी जरांगेंवर कोणते आरोप केले…

अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हेकेखोर असल्याचे आरोप केले. तसेच मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचाही आरोप बारसकर यांनी केला. तसेच जरांगे पाटील यांनी संत तुकाराम यांचा अवमान केला असल्याचाही आरोप बारसकर यांनी केला.

किर्तनकार अजय बारसकर म्हणाले, मी मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मराठवाड्यात कुणबी शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. त्यामुळे मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. पण जरांगे पाटील यांच्यासह काम करताना त्यांची हेकेखोर वृत्ती हळूहळू समजू लागली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसूदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. एकदा त्यांनी माझा महाराज असा जाहीर उल्लेखही केलेला आहे. पण त्यांचे खरे रुप समोर आल्यामुळे मी आता जनतेसमोर येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

अजय बारसकर म्हणाले, शिशूपालाचे १०० अपराध भरले, हे भगवान श्रीकृष्णाने म्हटले होते. त्याप्रमाणे या जरांगेचेही १०० अपराध आता भरले आहेत. मध्यंतरी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मी आंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे पाटील यांनी संताचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे मी दुःखी झालो. मला हे सहन झाले नाही, त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे.

बारसकर म्हणाले, जर मी बसमधून प्रवास करत असेल आणि मला जर कळलं की बसचा चालक मद्य प्यायलेला आहे.
तर सर्वात आधी मी बसमधून उतरेल आणि इतर प्रवाशांनीही बसमधून उतरावे, अशी बोंब ठोकेल.
आज मराठा समाजाच्या आंदोलनाचा नेतृत्व करणारा व्यक्ती असाच नशेत आहे, हे मला आवर्जून सर्वांना सांगायचे आहे.

अजय बारसकर म्हणाले, मनोज जरांगे हे अहंकारी आहेतच, पण त्यांच्या मुलांमध्येही हा अहंकार भरून राहिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगेंच्या मुलीने म्हटले की, माझ्या वडिलांनी देवालाही झुकायला भाग पाडले.
त्या लहान मुलीने उच्चारलेले हे वाक्य जरांगेंच्या अहंकाराच्या शिकवणुकीतून आले.

अजय बारसकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यापासून माझ्यावर फुटीरतेचे आरोप लावले जात आहेत.
मी सरकार आणि छगन भुजबळ यांचा एजंट आहे, असे सांगितले जात आहे.
पण मी भाजपा पक्ष आणि छगन भुजबळ यांच्यावर जहाल टीका केली आहे.
छगन भुजबळ माझे मित्र नाहीत. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.

मनोज जरांगे हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मनोज जरांगे पाटील हे रोज पलटी मारतात.
सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात.
मनोज जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा साक्षीदार आहे.
तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरेच बोलले.
मी योग्यवेळी ते जाहीर करीन, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना