Manoj Jarange Patil | ओबीसी नेत्यांना शेतकरी भाषेत जरांगेंचे उत्तर, ‘पिकत नाही ते वावर आम्हाला आणि स्वत: …’

जालना : Manoj Jarange Patil | कुणबी प्रमाणपत्रासह (Kunbi Certificate) मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्यावर त्यांना आरक्षणाचा केवळ तीन ते साडेतीन टक्केच लाभ मिळणार आहे. त्याऐवजी मराठ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे (EWS) १० टक्के घ्यावे, हा ओबीसी नेत्यांचा (OBC Leader) सल्ला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) धुडकावला आहे. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? असा खास शेतकरी (Farmer) भाषेतील सवाल जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना केला आहे.

ओबीसी नेत्यांना सुनावताना मनोज जरांगे म्हणाले, कायदा सांगतो की, मराठ्यांना मिळणारे हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार. म्हणजेच मराठ्यांना ५० टक्के (ओबीसींच्या एकूण आरक्षणापैकी) आरक्षण मिळेल. आता तुम्ही EWS चा मुद्दा काढू नका. हवं तर ते आरक्षण तुम्ही घ्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या.

तुम्ही ते १० टक्के आरक्षण घ्या आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आम्हाला द्या. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? चांगलं काळं रान तुम्ही घेताय आणि ज्या वावरात औत चालत नाही ते आम्हाला देताय. त्यापेक्षा वाटण्या करा आणि तुम्ही EWS आरक्षण घ्या आणि आम्हाला OBC आरक्षण द्या.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती सुधारल्याने त्यांनाचांगली आज रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
आता मी दोन दिवस अंतरवाली सराटी या माझ्या गावी जाणार आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.

जरांगे म्हणाले, ज्या-ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार.
त्यानंतर महाराष्ट्राचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार. मराठ्यांची एकजूट करण्यासाठी १५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा मराठवाडा आणि मुंबई असा दौरा करणार आहे.
आंदोलकांच्या गाठीभेटी घेणे सुरू करणार आहे. या काळात साखळी आंदोलन सुरूच राहील, असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही,
तसेच दिवाळीदेखील साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.
त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी दिवाळी साजरी करू शकत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आमदार अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकर म्हणाले, ”राजकीय फटाके फुटायला अजून वेळ, जनसामान्यांना अपेक्षित…”