Manoj Jarange Patil | सरकारची धडधड वाढली, जरांगे २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमवर ठाम, म्हणाले, ”कोरोनाच्या नावाखाली…”

जालना : Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी ठरल्याप्रमाणे २४ डिसेंबरची मुदत संपत आली आहे. आता काही तास शिल्लक राहिल्याने सरकारची (Shinde Fadnavis Govt) धडधड वाढली आहे. मंत्र्यांना पाठवून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण जरांगे (Manoj Jarange Patil) २४ डिसेंबरच्या अल्टीमेटवर ठाम आहेत. तसेच आता त्यांनी राज्य सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, कोरोनाच्या नावाखाली कलम १४४ लागू केलं किंवा अजून काही केलं तरी आम्ही मागे हटणार नाही, मराठे आरक्षण घेणारच. आमचं आंदोलन रोखण्यासाठी राज्य सरकारने याआधी एक प्रयोग केला होता. परंतु, आता त्यांनी अशा भानगडीत पडू नये.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मी राज्य सरकारला विनंती आणि आवाहनही करतो की त्यांनी आमचं आंदोलन दडपण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही मागे हटणार नाही. आम्ही शांततेत आंदोलन करत राहणार आणि आरक्षण घेणारच. राज्य सरकारने २४ डिसेंबरआधी आरक्षण देऊन त्यांचा शब्द पाळावा, हीच आमची मागणी आहे.

जरांगे म्हणाले, येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी काही केलं नाही तर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू.
राज्य सरकारने काहीही केलं तरी आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार. राज्य सरकारला वाटत आहे की मराठ्यांनी
मुंबईत यावं आणि चक्काजाम आंदोलन करावं.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सध्या तरी मुंबईतल्या आंदोलनाबद्दल काहीच जाहीर केलेलं नाही किंवा तसा विचार
केलेला नाही. मुंबईत येण्याची कुठलीही रणनीति आखलेली नाही. परंतु, सरकारच आता आम्हाला या आंदोलनासाठी
प्रवृत्त करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…

Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना