Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil | सगे सोयरे कायद्याची सरकारने अमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Andolan) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला.(Manoj Jarange Patil)

तसेच कोणतेही वैद्यकीय उपचारही मनोज जरांगे यांनी नाकारले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाही. जरांगे यांचा बीपी खालावला आहे.

जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे, अन्यथा त्यांची प्रकृती आणखी खालावेल असं डॉक्टर जयश्री भुसारी
माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान आम्ही त्यांना वारंवार उपचार घेण्यास सांगतोय.
मात्र जरांगे पाटील यांनी उपचार नाकारल्याची प्रतिक्रिया डॉक्टर जयश्री भुसारी यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अग्रवाल दांपत्यासह आरोपी मकानदारच्या पोलीस कोठडीत 14 जून पर्यंत वाढ; मकानदारला दिलेल्या 4 लाखांपैकी 3 लाख जप्त

Otur Pune Crime News | नशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक; चार अल्पवयीन मुले ताब्यात

Maharashtra School Uniform | राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना लागू

NEET Exam | नीट परीक्षेच्या पावित्र्याला धोका; सुप्रीम कोर्टाने NTA ला बजावली नोटीस