Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका, म्हणाले – ”त्याच्या डोक्यात गटारातले…”

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे यांची मनधरणी राज्य सरकार करत असल्याने दुखावलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मी करतो, असे भुजबळ म्हणाले होते. यावरून आता जरांगे यांनी भुजबळांवर सडकून टीका केली आहे. (Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal)

जरांगे म्हणाले, मराठा समाजाविषयी चांगले बोलावे इतका त्यांचा स्वच्छ हेतू कधीच नव्हता. हा खूप खालच्या दर्जाचा विचार करणारा माणूस आहे. मराठ्यांना हे आधीच समजले असते तर त्यांनी कधीच याला मोठे केले नसते. मराठ्यांना वाटले होते हा माणूस चांगल्या विचारांचा आहे. पण त्याच्या डोक्यात गटारातले किडे भरले आहेत. (Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal)

मनोज जरांगे म्हणाले, मराठे भुजबळांना चांगला माणूस समजत होते.
त्यामुळे त्यांनी भुजबळांना मोठे केले. परंतु, आता ते मराठा समाजाविरोधात गरळ ओकू लागले आहेत. परंतु, आता लोकांना समजले आहे की या माणसाच्या आत किती मोठी गटारगंगा आहे. याच्या डोक्यात मराठा समाजाविषयी विष आहे. ते नेहमी कुचके बोलत असतात. मी भुजबळांना एकच सांगेन, आमच्या नादी लागू नका, शहाणे व्हा, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Will Ashok Chavan Join BJP? | अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार

Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला,
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू;
चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार