Manoj Jarange Patil | ‘कुणबी नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार मराठा आरक्षण अमान्य’ : जरांगे

जालना : Manoj Jarange Patil | ज्यांची कुणबी नोंद सापडलेली नाही, त्यांच्यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून त्यानुसार नोंदी नसलेल्यांना आरक्षण देणार आहेत. नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण आम्हाला मान्य नाही. ते आरक्षण ज्यांना हवे आहे त्यांनी घ्यावे, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Manoj Jarange Patil)

सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी
केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. २० तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर २१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची
दिशा बदलणार आहे. ते आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल.

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी मराठेच नव्हे,तर
सर्व ओबीसींसाठी फायद्याची ठरणार आहे. सर्वच जाती-धर्मांच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे.
हे आमच्या आंदोलनाचे यश आहे. परंतु, छगन भुजबळ यांना ते पचत नाही.
ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षातील लोकांचे त्यामुळे हाल होणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, १० टक्के मराठा आरक्षणाचा होऊ शकतो कायदा

Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई

Pune Cheating Fraud Case | ज्येष्ठ दाम्पत्याची 60 लाखांची फसवणूक, 6 जणांवर MPID