Manoj Karjagi | मिठी मारत चुंबन घेण्याचा केला प्रयत्न, ‘या’ काँग्रेस नेत्यावर महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक शोषणाचा आरोप

धारवाड : Manoj Karjagi | सध्या देशात बलात्कार, अत्याचार तसेच लैंगिक शोषण या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या (Congress) नेत्यावर लैंगिक शोषणाचे (sexual abuse) आरोप करण्यात आले आहेत. कर्नाटक काँग्रेसमधील एका नेत्याने सलूनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण (Molestation Case) केले आहे. या प्रकरणी या काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली आहे. (Manoj Karjagi)

काय आहे नेमके प्रकरण ?

मनोज करजागी (Manoj Karjagi) असे या आरोपी काँग्रेस नेत्याचे नाव आहे. ब्युटीशियनचं काम करणाऱ्या पीडित महिलेने मनोज करजागी याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीमध्ये आरोप केला की, आरोपी मनोज करजागी शनिवारी सलूनमध्ये आला होता. यावेळी त्याने या महिलेला जबरदस्तीने मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर या महिलेने याची माहिती आपल्या प्रियकराला दिली. त्यानंतर प्रियकराने दोन मित्रांसोबत सलूनमध्ये धाव घेऊन या काँग्रेस नेत्याची धुलाई केली.

कोण आहेत मनोज करजागी?

आरोपी मनोज करजागी हा काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याचा सहकारी आहे. तसेच तो पक्षकार्यामध्ये सक्रिय आहे.
काँग्रेस नेते सिद्धारामय्या (Congress leader Siddaramaiah) मुख्यमंत्री असताना तो उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य पहिवहन निगमचा संचालक होता.
या प्रकरणी आरोपी मनोज करजागीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title :- Manoj Karjagi | molestation of woman by congress leader in karnataka accused arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारख्या ‘हुबेहुब’ दिसणाऱ्या तोतयावर गुन्हा दाखल, कुख्यात गुंड शरद मोहोळ सोबतचा फोटो केला व्हायरल

HSC – SSC Exam 2023 | दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा