Manoj Prabhakar | मनोज प्रभाकर यांचा नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाईन : Manoj Prabhakar | भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी नेपाळ क्रिकेट संघाच्या (Nepal Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात माहिती दिली आहे. मनोज प्रभाकर यांनी 15 डिसेंबर 2022 रोजी नेपाळ पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशननेसुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Manoj Prabhakar)

जूनमध्ये स्वीकारला होता पदभार

मनोज प्रभाकर यांनी गेल्या जूनमध्ये नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची पुबुडू दासानायकेच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. दासानायके यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. प्रभाकर यांच्या देखरेखीखालील नेपाळ क्रिकेट संघाची कामगिरी मोठ्या प्रमाणात सुधारली होती. (Manoj Prabhakar )

केनियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका जिंकली

नेपाळच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या केनियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 असा विजय मिळवला होता. याशिवाय नेपाळच्या संघाने एकदिवसीय मालिकेतही 3-0 असा एकतर्फी मालिका विजय मिळवला होता.

नेपाळच्या वनडे दर्जाला धोका

सध्या नेपाळ क्रिकेट संघावर वनडे दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता मनोज प्रभाकर यांनी प्रशिक्षकपद सोडल्याने नेपाळचा संघ दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत नेपाळचा संघ कसा तग धरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज प्रभाकर यांची क्रिकेट कारकीर्द

मनोज प्रभाकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 1984 ते 1996 दरम्यान 39 कसोटी आणि 130
एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना कोचिंगचा बराचसा अनुभव आहे.
यापूर्वी त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या संघाच्या कोचिंगची जबाबदारी पार पाडली आहे.
2008 मध्ये ते दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक होते त्यावेळी दिल्लीने रणजी करंडक जिंकला होता.

Web Title :- Manoj Prabhakar | manoj prabhakar steps down as coach of nepal cricket team information given by the board

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक; पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं

Thackeray Group | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; ‘राऊतांची पाठ फिरली अन् नगरसेवक देखील फिरले…’

MP Sanjay Raut | भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर