‘या’ 5 कारणांमुळं मनोज तिवारींना दिल्ली भाजपा अध्यक्ष पदावरून हटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनोज तिवारी यांना दिल्ली भाजपा अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. हे पद आता आदेश कुमार गुप्ता सांभाळणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी संघटनेतील या बदलाची माहिती दिली. आदेश कुमार गुप्ता, उत्तर दिल्ली महापालिकेचे महापौर होते. सध्या ते पटेल नगरमधून नगरसेवक आहेत. परंतु, या बदलादरम्यान सतत हा प्रश्न उपस्थित होत आहे की अखेर कोरोना व्हायरसच्या गंभीर स्थितीत असे काय झाले की, भाजपाने हा निर्णय घेतला. यामागे अनेक कारणे आहेत.

लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळणे महागात पडले
मनोज तिवारी, दिल्ली निवडणुकीनंतर राजकारणाबाबत अज्ञानी असल्याचे सतत दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून शेजारी राज्य हरियाणामध्ये एका क्रिकेट अकॅडमीत ते क्रिकेट खेळताना दिसले. संपूर्ण जग घरात लॉकडाऊन असताना तिवारी क्रिकेट खेळत असल्याचे उघड झाल्याने त्यातून भाजपाबाबत अतिशय वाईट संदेश गेला. भाजपा नेत्यांमध्ये सामाजिक जबाबदारी नाही असे यातून दिसून आले. तिवारी यांची जागा भरण्यासाठी संघटना अनेक दिवसांपासून काम करत होती. अखेर एका जमिनीवरील नेत्याची निवड करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणूक मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. अन्य वाचाळ भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांनी निवडणुकीवर परिणाम केलेला असतानाही पराभवाला मनोज तिवारी यांना जबाबदार धरण्यात आले. पराभवानंतर त्यांनी लगेचच पक्षाकडे आपला राजीनामा दिला होता, परंतु पक्षाला योग्य नेत्याचा शोध घ्यायचा असल्याने त्यांना काही दिवस पदावर राहण्यास सांगण्यात आले होते. म्हणजेच भाजपाने निवडणूक निकालानंतर नेतृत्व शोधण्यास सुरूवात केली होती. पक्षाचा शोध पूर्ण होताच 4 महिन्यानंतर मनोज तिवारी यांना या पदावरून हटवण्यात आले.

सेलिब्रिटींना संधी दिल्यानंतर चांगले काम झाले नसल्याचे यापूर्वीही भाजपाने अनुभवले आहे. यापूर्वी सुद्धा भाजपाने दिल्लीमध्येच किरण बेदी यांना उच्च पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले होते, त्यावेळीही पक्षाला पच्छाताप करावा लागला होता. मनोज तिवारी यांना अध्यक्षपदावरून हटवणे याचेच उदाहरण आहे. त्यांच्या ठिकाणी एक अनोळखी नाव आदेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, भाजपाला आता सेलिब्रिटी नको तर लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे आहे.

आगामी महापालिका निवडणुकांची तयारी
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयानंतर म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून ही निवड केली आहे. भाजपाची दिल्ली-पूर्व, पश्चिम आणि उत्तर तीन महापालिकांवर सत्ता आहे आणि पुढील निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत. अशात मनोज तिवारी ऐवजी स्थानिक राजकारण जाणणार्‍या नेत्याला दिल्लीत अध्यक्ष पदावर आणणे जरूरी होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनला सरकारने ना केवळ एक ठोस पाऊल म्हणून लागू केले तर याची नैतिक जबाबदारी सुद्धा नागरिकांना घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून कोरोनाच्या लढाईत देश यशस्वी होऊ शकतो. भाजपा नेतृत्वामध्ये केंद्र सरकार पार्टी लाईनच्यावर जाऊन राज्य सरकारांना मदत करत आहे. अशात दिल्ली सरकारच्या विरोधात सार्वजनिक आंदोलन करण्यासाठी राजघाटावर लोकांसोबत जाणे आणि त्याच्या एकदिवसानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून हटवले जाणे हा एक संकेत आहे.