मणिकर्णिका नंतर कंगनाच्या खात्यात आणखी एक बायोपिक

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची भर पडणार आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री कंगना रनौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यासोबतच कंगनानेही ही माहिती शेअर केली आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जिवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाचं नाव ‘जया’ असं असेल तर तामिळमध्ये ‘थलाइवी’ असं असणार आहे.जयललिता याचं निधन ५ डिसेंबर २०१६ मध्ये चेन्नईत झाले. तामिळनाडूमधील राजकारण अनेक वर्षें जयललिता यांच्याभोवती फिरत होते. त्यामुळे जयललिता यांच्यावरील चित्रपटाला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभेल, यात शंका नाही.

काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा बायोपिक प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अभिनयानंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

You might also like