Sacred Games 2 : ‘ही’ असतील एपिसोड्सची नावं

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वीच या सीक्वलची घोषणा नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली. या सीक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता नेटफ्लिक्सने एपिसोड्सची नावं जाहीर केली आहेत.

कॅलेंडर निकाल. तारीख लिख ले. १४ दिनमे कुछ बडा होनेवाला है’ अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर होती. आता नेटफ्लिक्स इंडियाने चार फोटोंसोबत चार नावं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. ‘सेक्रेड गेम्स २’ च्या चार एपिसोडशी या नावांचा संबंध जोडला जात आहे. ‘बोला अहम ब्रह्मास्मि. सहा दिवसांत सगळं काही स्पष्ट दिसू लागेल’ असं लिहून त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ‘बिदल : – ए – गीता’, ‘कथम् अस्ति’, ‘अन्तर महावन’, ‘अनागमम्’ अशी या चार एपिसोड्सची नावं असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता काहीतरी नवं आणि वेगळं पाहायला मिळणार याची खात्री पटली आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये आठ एपिसोड होते. यातील व्यक्तिरेखा या हिंदू पौराणिक कथा आणि व्यक्तिरेखांमधून घेतले होते. अश्वथामा, हलाहल, अतापी वतापी, ब्रह्महत्या, सारामा, प्रेतकल्प, रूद्रा आणि ययाती अशी व्यक्तिरेखांची नावं होती.

सेक्रेड गेम्सला फक्त भारतातच नाही तर जगभरात यश मिळालं. सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी मिळून या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. नवाजुद्दीनचा भाग अनुराग कश्यपने आणि सैफ अली खानचा भाग विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केला होता.

 

Loading...
You might also like