Raat Akeli Hai Trailer : नवाजुद्दीन सिद्दीकी उलगडणार ‘मर्डर मिस्ट्री’ ! पहा ट्रेलर

बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रात अकेली है असं या सिनेमाचं नाव आहे. हा एक क्राईम स्टोरी बेस सिनेमा आहे. नवाज यात काही वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची खूप चर्चा होत आहे.

नवाजुद्दीननं रात अकेली है या सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नवाज यात मर्डर मिस्ट्री सॉल्व करताना दिसणार आहे. जटिल यादव असं नवाजच्या रोलचं नाव आहे. एका मोठ्या नेत्याचा खून झाला आहे आणि त्याच्या खुनाच्या तपासाची जबाबदारी ही नवाजवर असते. ट्रेलरध्ये या सगळ्यातील गुंतागुंतही दिसत आहे. खून कोणी केला आणि का केला असा सर्व तपास नवाजला करायचा आहे. यात काय ट्विस्ट्स आहेत हे आता सिनेमा पाहताना कळेलच. या सिनेमाची स्टोरीही छान आहे. ट्रेलरवरून याचा अंदाज येत आहे.

सिनेमातील कास्टींगबद्दल…

रात अकेली है या सिनेमात नवाज व्यतिरीक्त राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे अनेक कलाकार दिसणार आहेत. सिनेमाच्या रिलीजबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 31 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.